देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यास ‘या’ नेत्यांची विरोधी पक्ष नेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता ?

0
442

मुंबई, दि.७ (पीसीबी) – भाजपने देखील पक्षांतर्गत मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहेत. बीजेपी हायकमांड महाराष्ट्रात मोठे बदल करण्याची शक्यता असल्याचे बोलले जातंय.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बोलावण्याची शक्यताही आहे. त्यांना केंद्रात जबाबदारी देऊन महाराष्ट्रात नव्या नेत्याला संधी दिली जाऊ शकते. असे झाले तर चंद्रकांत पाटील यांची विरोधीपक्ष नेते पदावर निवड होऊ शकते तर पंकजा मुंडे यांना प्रदेशाध्यक्षपद दिले जाऊ शकते. महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील स्थानिक नेत्यांत समन्वय राखत राष्ट्रवादीची बांधणी सुरू केली आहे. महापालिका निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय बैठका घेऊन स्थानिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांच्यावर नवी मुंबईत राष्ट्रवादीची पक्ष संघटनेची बांधणीसोबतच महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्यातल्या राजकारणाची सध्याची दिशा आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन अमित शहा यांनी महाराष्ट्रात लक्ष घालण्याचा निर्णय घेतल्याचं बोलले जातंय. पक्षांतर्गतही नाराजी उफाळून आली होती. त्या पार्श्वभूमीवर काही मोठे बदल होऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जातेय.