देवेंद्र फडणवीस, आता तुम्ही फक्त एवढे कराच…

0
221

– खासदार संजय राऊत यांचा उपहासात्मक सल्ला

मुंबई, दि. २६ (पीसीबी) : ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’, असे सांगूनही देवेंद्र फडणवीस सत्तेत आले नाहीत. पुढची २५ वर्षे त्यांची सत्ता येऊही शकणार नाही. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यांचे मन अशांत झाले आहे. अशांत मनावर एकच उपचार आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या देवघरात हनुमान चालीसा वाचावी. जेणेकरून फडणवीसांचं मन शांत होईल, असा खोचक टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. या देशात कोणत्या प्रकारचे वातावरण आहे? केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांवर कसा दबाव आणला जातो, न्यायालयांवरही कशा प्रकारे दबाव आणला जातो, अनेक राज्यांमध्ये विरोधी पक्ष कसा दहशतीत आहे, तसेच देशातील मानवी हक्कांबाबत जागतिक पातळीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस नेमक्या कोणत्या हिटलरशाहीबद्दल बोलत आहेत, हे समजून घ्यावे लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी देशातील स्थितीवरच चिंता व्यक्त केली असण्याची शक्यता आहे, असे राऊत यांनी म्हटले.

कोणी माथेफिरू ओठाखाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल तर…; राऊतांनी उडवली खिल्ली
तसेच राणा दाम्पत्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबतही ते जनतेची दिशाभूल करत आहेत. राणा दाम्पत्यावर हनुमान चालीसा वाचल्याने गुन्हा दाखल झालेला नाही. आपले मन अशांत असेल तर स्वत:च्या देवघरात हनुमान चालीसा वाचावी. दुसऱ्याच्या घरी जाऊन वातावरण बिघडवल्यास कारवाई होणारच, असे संजय राऊत यांनी सांगितले.

सगळेच माझ्यासारखे नसतात, माझी सत्ता गेली तेव्हा मी वानखेडेवर जाऊन मॅच पाहत बसलो: शरद पवार

चेष्टा करणाऱ्यांना सोमय्यांचा इशारा
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुंबई पोलिसांवर टीकास्त्र सोडले आहे. पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या सांगण्यावरून माझ्या नावावर खोटी एफआरआय नोंदवण्यात आली. यासाठी वांद्रे पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपायुक्तांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्रालयात गंभीर चर्चा झाली आहे. काही लोक यावरून चेष्टा करत आहेत. मात्र, सीआयएसएफने कालच यावरून मुंबई पोलिसांना इशारा दिला आहे. आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे सीआयएसएफने मुंबई पोलिसांना कळवल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला