दुष्काळमुक्त मराठवाडा हे मुंडे साहेबांचं स्वप्न होते – देवेंद्र फडणवीस

0
371

औरंगाबाद,दि.२७(पीसीबी) – ‘दुष्काळमुक्त मराठवाडा’ हे गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वप्न होतं, जर मराठवाड्याचं पाणी थांबवण्याचा प्रयत्न केलात, तर संपूर्ण मराठवाडा रस्त्यावर उतरेल, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिला आहे.

मराठवाड्यातील पाणी प्रश्नी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी औरंगाबादच्या आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या आहेत. त्यांच्या समर्थनार्थ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपोषणाला हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, तुम्हाला क्रेडिट हवं असेल तर घ्या, नाव बदलायच तर बदला, अजून काही बदल करायचे ते करा पण ही योजना मराठवाड्यासाठी आहे. योजना रद्द केली तर रस्त्यावर उतरुन लढाई लढू, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. महाविकास आघाडीच्या काळात मराठवाड्यावर अन्याय होत आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. पंकजा मुंडे यांच्या उपोषणस्थळी फडणवीसांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.