दुकान फोडून सात हजारांच्या सिगारेट चोरीला..

0
296

हिंजवडी, दि. ३१ (पीसीबी) – दुकानाच्या मागील बाजूला असलेल्या दरवाजाची कडी कोयंडा तोडून एका चोरट्याने दुकानात प्रवेश केला. दुकानातून सहा हजार 854 रुपये किमतीच्या सिगारेट पॅकेट चोरट्याने चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 30) सकाळी स्वराज चौक, हिंजवडी येथे उघडकीस आली.

 

शुभम केरबा धोने (वय 22, रा. जुनी सांगवी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत शशिकांत गायकवाड (वय 18, रा. बालेवाडी गावठाण, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वराज चौक, हिंजवडी येथे फिर्यादी धोने यांचे दुकान आहे. त्यांनी बुधवारी रात्री दहा वाजता त्यांचे दुकान कुलूप लावून बंद केले. रात्रीच्या वेळी आरोपी प्रशांत याने दुकानाच्या मागील बाजूच्या दरवाजाची कडी कोयंडा तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातून सहा हजार 854 रुपयांचे सिगारेट पॅकेट आणि 400 रुपये रोख रक्कम असा एकूण सात हजार 254 रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.