दि.बुद्धीस्ट इंटरनॅशनल स्कूल पिंपळे गुरव,पुणे येथे वार्षिक स्नेहसंम्मेलन संपन्न

0
667

पिंपरी, दि.१ (पीसीबी) – बुद्धीस्ट इंटरनॅशनल स्कूल पिंपळे गुरव,पुणे येथे WE THE PEOPLE OF INDIA  या शीर्षकाखाली दि.२९ डिसेंबर २०१९,रविवार रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर,पिंपरी,पुणे येथे वार्षिक स्नेहसंमेलन थाटात पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध व परम पूज्य बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्रिसरण पंचशील व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा अरविंद साळवे हे होते,कार्यक्रमाचे उद्घाटक सामाजिक न्याय पुणे विभागाचे रिजनल कमिशनर सोशल अविनाश देवसटवार यांनी केले.प्रसंगी सिनेअभिनेते महेंद्र बेरकर,दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त संतोष संखद,संस्थेचे अध्यक्ष अरविंद साळवे,उपाध्यक्ष विकास  साळवे,सचिव मनीषा साळवे,साळवे,साळवे,साळवे,कार्यालयीन अधिक्षक तथा खजिनदार अजित गायकवाड,कॉश्च्यूम डिझायनर सोनालीताई संखद,पालक टिचर्स असोसिएशनच्या अध्यक्षा रूपालीताई सोनवणे आणि आणि संचालक तथा शाळेचे प्राचार्य भारत साळवे उपस्थित होते.त्यावेळी प्रमुख उपस्थितीतांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.याचे सूत्रसंचालन अजित गायकवाड यांनी केले,याप्रसंगी शाळेचे प्राचार्य भारत साळवे यांनी  शाळेच्या स्थापनेपासून शाळेला येणाऱ्या अडचणी त्या अडचणींवर मात करून शाळेचा आज पर्यंत चा प्रवास आणि सद्यस्थिती व भविष्यात कोणच्या वेगवेगळ्या शाखा आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक-शारीरिक आणि बौद्धिक विकासामध्ये शाळेची भूमिका याबद्दल प्रास्ताविक केले,उद्घाटन प्रसंगी बोलताना देवसटवार सरांनी स्कूलच्या प्रगतीला व मुलांच्या  शैक्षणिक प्रगतीला शुभेच्छा दिल्या,सोबतच महेंद्र बोरकर यांनीदेखील गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांना मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले,त्यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष विकास साळवे यांनी आंबेडकरी विचारधारेचा शाळा  निर्माण होणे आणि त्या मोठ्या होणे का गरजेचे आहे याचे मार्मिक विवेचन केले हिल्या सत्राच्या उत्तरार्धात कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद साळवे यांनी अध्यक्षीय भायणात शाळेच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त करत असताना संचालक मंडळ एकत्र आल्यामुळे डबघाईला गेलेल्या शाळेचे कसे पुनरूज्जीवन झाले आणि ही शाळा कशी मजबूत स्थितीत उभी राहिली याविषयी पोटतिडकीने आपल्या भावना व्यक्त करून अध्यक्षीय समारोप केला व सर्व स्टाफ च्या कामाचे कौतुक केले. यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये WE THE PEOPLE OF INDIA  या शीर्षकाखाली घेण्यात येणाऱ्या प्रबोधनात्मक मनोरंजन तथा सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली यामध्ये सर्वच वर्गाच्या  विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गाण्यावर बहारदार नृत्य सादर करताना सर्व प्रेक्षकांची मने जिंकली यामध्ये सर्वच वर्गांचे विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषा मध्ये थिरकताना दिसले. कार्यक्रमाच्या शेवटी संचालक मंडळातील काही सदस्य स्टाफ मधील काही सदस्य व पालकांमधूनही खुमासदार डान्स सादर करण्यात आला,सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे प्राचार्य भारत साळवे यांनी केले, शेवटी प्रमुख पाहुणे,सहभागी  विद्यार्थी,संचालक मंडळ ,PTA चे सर्व सदस्य,विकास जगताप, अनिल कांबळे,दिनेश गायकवाड, ज्ञानेश्वर सुरवसे अशोक म्हस्के,विशाल खुणे , गीता जगताप माधव शिंदे कविता जगताप,लता भगत,प्रशांत सुर्वे,वंदना गायकवाड,अंकिता ताई,प्राजक्ता सोनावणे, शाळेचा सर्व स्टाफ,सर्व पालक वर्ग,नृत्यदिग्दर्शक योगी सर,राजेंद्र सर,मुलांचा मेकअप करणाऱ्या प्रियाताई चौरे,रूपालीताई सोनवणे, कविता ताई जगताप,उज्वला शिंदे,किरण ताई साळवे,अश्विनी साळवे,वैशाली कांबळे,ज्योती खरात,तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत करणा-या सर्वांचे आयु विकास साळवे यांनी आभार व्यक्त केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाची तयारी आणि यशस्वीतेसाठी चंद्रकांत कांबळे,जया गायकवाड,आम्रपाली कांबळे,आशा कांबळे,मेघा दरेकर,सोनम जगताप,पल्लवी कोकणे,श्रुती भिवरे,गायत्री कोल्हे,आणि जयश्री दरेकर मावशी आदिनी परिश्रम घेतले.