दिल्लीतील एम्स रूग्णालयाला भीषण आग

0
735

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – दिल्लीतील एम्स रूग्णालयाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना आज (शनिवार) दुपारी घडली आहे. ही आग शार्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. अग्निशमन दलाच्या ३४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात इलेक्ट्रिकचे काम सुरू आहे. त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, एम्स रुग्णालयातील इमरजन्सी लॅबजवळ ही आग लागली आहे. आगीच्या घटनेमुळे ही लॅब बंद करण्यात आली आहे.  या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली हेदेखील याच रूग्णालयात दाखल असून त्यांच्यावर याच ठिकाणी उपचार सुरू आहेत. तसेच या ठिकाणी अनेक बडे नेतेही त्यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी येत आहेत.