दिलीप वळसे पाटलांच्या हातात येणार पुणे जिल्ह्याची सूत्रं

0
1006

पुणे,दि.२७(पीसीबी) – महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रसचं सरकार बनणार हे निश्चित झालं आहे. आता यानंतर पुणे जिल्ह्यात मंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि सात वेळा निवडून आलेेल्या दिलीप वळसे-पाटील यांची पुण्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यातील राजकारणात दिलीप वळसे-पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. वळसे पाटील यांचा अनुभव पाहता त्यांची मंत्रिपदी पुन्हा नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्याचं नेतृत्व आत्तापर्यंत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे होतं. मात्र अजित पवारांची भूमिका स्पष्ट नसल्याने पुण्याचं पालकमंत्रीपद दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे जाईल, असं बोललं जात आहे.