अजित पवारांना उपमुख्यमंत्री नव्हे तर त्यापेक्षाही मोठं झालेलं पाहायचंय – सुनील तटकरे

0
423

मुंबई,दि.२७(पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री व्हावे अशी माझी आणि आमदारांची भावना आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घेतील. अजित पवारांना उपमुख्यमंत्री नव्हे तर त्यापेक्षाही मोठं झालेलं मला पाहायचं आहे, असं राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक झाली. यावेळी जे काही संभ्रम निर्माण झाले होते ते आता दूर झाले आहेत. आम्ही पुढे जात आहोत. अजित पवारांनी बैठकीला मार्गदर्शन केलं, अशी माहिती तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

दादांविषयी सर्व आमदारांच्या मनात आदरभाव आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री व्हावं अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. मात्र, शरद पवारांचा निर्णय अंतिम असेल, असंही ते म्हणाले आहेत.