दिघी, भोसरी, पिंपरीत घरफोडीच्या घटना; १ लाख ११ हजारांचा मुद्देमाल लंपास 

0
1119

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – दिघी, भोसरी आणि पिंपरीत घरफोडीच्या तीन घटना घडल्या आहेत. या घरफोडीमध्ये एकूण १ लाख ११ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. याप्रकरणी पिंपरी, भोसरी, दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

दिघीतील स्वामी समर्थ क्लिनिकचा मध्यरात्री कुलूप कोयंडा उचकटून आतमधील टेबलाच्या डॉवरमधील  ७० हजारांची गुरूवारी(दि. २२) रोकड लंपास केली. याप्रकरणी डॉ. सचिन बाळासाहेब पाटील (वय ३२,रा, संत गजानननगर, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तर भोसरीतील मनोज गुलाबराव पाटील (वय, ३८ रा. शास्त्री चौक) यांचे गुरूवारी घर बंद होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. आणि किचनमधील लाकडी कपाटात ठेवलेले ३६ हजार रूपयांचे सोन्या –चांदीचे दागिने लांबविले.

गजेंद्र लक्ष्मण सवाईकर (वय ३७, रा. अजमेरा, पिंपरी)  यांच्या बुधवारी (दि. २१) सकाळी ११ ते रात्री ९ या कालावधीत बंद घरात प्रवेश करून घरातील ५ हजारांची रोकड चोरट्यांनी  पळवली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.