‘त्या’ सोसायटीधारकांनी मानले आमदार महेश लांडगे यांचे आभार!

0
236

– महापालिका प्रशासन- सोसायटी प्रतिनिधींच्या वादावर यशस्वी तोडगा
– चिखली-मोशी-चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशनचा पुढाकार

पिंपरी, दि.11(पीसीबी) : सोसायटीधारक, बांधकाम व्यावसायिक आणि महापालिका प्रशासनातील जबाबदार अधिकारी यांच्यात असलेल्या सक्षम समन्वयाअभावी सोसायटीधारक रहिवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी या समस्यांचा तात्काळ पाठपुरावा करीत सोसायटीधारकांचे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले. याबाबत सोसायटीधारक प्रतिनिधींनी लांडगे यांचे आभार मानले आहेत.

चिखली-मोशी- चऱ्होली हाउसिंग सोसायटीच्या माध्यमातून सोसायटीधारक नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. पार्किंग, वीज पुरवठा यांसह पायाभूत सोयी-सुविधांबाबत बांधकाम व्यावसायिकांकडून होणारी अडवणूक, सोसायटीधारकांना महापालिका अधिकाऱ्यांकडून मिळणारी दुय्यम वागणूक अशा विविध मुद्यांवर आमदार लांडगे यांनी संबंधित अधिकारी, सोसायटीधारक प्रतिनिधी यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. या बैठकीत मांडलेल्या विविध तक्रारींमधील बहुतेक प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत.

‘दादा, आपने तो जादू कर दिया…’
गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत आमदार लांडगे यांच्यासमोर सोसायटीधारकांनी अनेक तक्रारी आणि समस्या मांडल्या होत्या. त्यापैकी काही समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यात आले. तसेच, इतर समस्या सोडवण्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला आदेश दिले आहेत. याबाबत कृतज्ञता म्हणून सोसायटीधारकांच्या प्रतिनिधींनी आमदार लांडगे यांची भेट घेतली. यावेळी एका सोसायटीचे पदाधिकारी म्हणाले की, ‘दादा, आपने तो जादू कर दिया। हमारे सोसायटी का कठीण और महत्त्वपूर्ण मसला सुलजाया, आपने जादू किया।’ अशा शब्दांत सोसायटीधारकांच्या भावना व्यक्त केल्या.

‘हमे जो भेट दिया, वह उम्मीद से भी जादा है…’
नेवाळे वस्ती – कुदळवाडी येथील अक्षा इलिगन्स या सोसायटीला गेल्या १० वर्षांपासून रस्त्याची समस्या होती.या सोसायटीमध्ये १७० सदनिकाधारक आहेत. त्यांना ये-जा करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत संबंधित सोसायटीचे चेअरमन शफीउद्दीन हाश्मी यांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत साकडे घातले होते. यावर तात्काळ कार्यवाही करीत आमदार लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला. यावर चेअरमन हाश्मी म्हणाले की, दादा का क्विक ॲक्शन किसी चमत्कार से कम नहीं था। हमे जो भेट दिया, वह उम्मीद से भी जादा दिया। यावर आमदार लांडगे यांनीही सोसायटीधारक नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारत यापुढे सोसायटीधारकांच्या समस्या असतील, तर माझे कार्यालयीन प्रतिनिधी श्री. शिवाजी घाडगे (मोबाईल क्रमांक : 9325505505) आणि सोसायटी फेडरेशनचे सचिव संजीवन सांगळे (मोबाईल क्रमांक: 8975282377) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.