गहूंजे येथील बोडकेंच्या झेंडूची जिल्ह्यात चर्चा

0
563

शिरगाव,दि.11,(पीसीबी) : वार्ताहर गहूंजे येथील शेतकरी संजीवकुमार बोडके यांच्या शेतातील लड्डू झेंडूची संबंध जिल्ह्यात चर्चा होत आहे याविषयी अधिक माहिती अशी की गहूंजे येथील प्रगतशील शेतकरी संजीवकुमार बोडके हे नेहमी आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करून ते यशस्वी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांनी लाल कांद्याचे विक्रमी उत्पादन घेतले होते. यावर्षी त्यांनी ऑगस्ट महिन्यात आपल्या एक एकर शेतात झेंडूची लागवड केली होती पैकी 20 गुंठ्यांत एलो स्टार जातीचा पिवळा झेंडू आणि उर्वरित 20 गुंठ्यांत लड्डू जातीचा लाल रंगाचा झेंडू लावला होता.आतापर्यंत या झेंडूची साडे तीन लाख रुपयांची कमाई करून दिली आहे आणि आणखी अडीच ते तीन लाख रुपये नक्की होतील असे त्यांनी सांगितले. सध्या रोज 180 ते 250 किलो फुलं निघतात आणि सध्या 120 ते 150 रुपये प्रति किलो भाव मिळत असल्याने ते आनंदी आहेत.

त्यांना आतापर्यंत सुमारे एक लाख रुपये एव्हडा खर्च आला आता तोडणी व्यतिरिक्त इतर कोणताही खर्च होत नाही आणि आणखी पिकही महिनाभर चालेल असेही यावेळी बोडके यांनी सांगितले.जर शेण खत टाकले तर फुलांचा रंग आणि आरोग्य चांगले राहते त्यामुळे भाव चांगला मिळतो आणि पर्यायाने उत्पन्न चांगले मिळते.विशेष म्हणजे ते सलग गेली पाच ते सहा वर्षे असे विक्रमी उत्पादन घेत आहेत त्यामुळे या पिकात त्यांचा हातखंडा निर्माण झाला आहे .बोडके त्यांना या पिकाची माहिती आणि जास्त उत्पादन कसे मिळवायचे याबद्दल मार्गदर्शन युवराज राठोड व अशोक पवार यांनी केले . या प्रयोगाविषयी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले  की, लहान क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना हे पीक अत्यंत चांगले उत्पादन देणारे आहे शिवाय जास्त दिवस लागत नसल्याने कामही कमी करावे लागते आणि ईतर जास्तीचे खर्च नाहीत शिवाय नगदी पीक असल्याने रोज पैसे घरात येतात त्यामुळे संबंध घराचे मानसिक आरोग्य चांगले राहते. कोरोना6मुळे संबंध जगाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे परंतु हे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक त्रास झाला नाही.

त्यामुळे कमी शेती असणाऱ्यांनी हे पीक आवर्जून घ्यावे .जर तालुक्यात कोणालाही याबद्दल माहिती लागल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क केला तरी मी सर्व मार्गदर्शन करील आणि पंचक्रोशीत जर हा प्रयोग जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी केला तर शेतीतून फुलं घेऊन जाण्याची व्यवस्था होते त्यामुळे बाजारात जाण्याची आवश्यकता भासणार नाही.