‘त्या’ नराधमांना तात्काळ अटक करा -विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची मागणी

0
213

माझे डोळे परत द्या…मी त्या नराधमांना ओळखेन…शिरुरमधील पिडित महिलेची आर्त विनवणी

पुणे दि. ६(पीसीबी) – त्यादिवशी नेमके काय घडले ते मी सर्व सांगेन… आरोपींना मी ओळखते..त्या नराधमांनी माझ्यावर काय-काय अत्याचार केले हे पण सांगेन… पण मला माझे दोन्ही डोळे परत द्या… अशी आर्त विनवणी शिरुर घटनेतील पिडित महिलने आज केली. शिरुर तालुक्यातील न्हावरे गावातील एका महिलेवर क्रूर हल्ला करुन तिचे डोळे काढण्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज तातडीने पुणे येथील ससून रुग्णालयात जाऊन त्या पिडीत महिलेची भेट घेतली. याप्रकरणातील नराधमांना तात्काळ अटक करण्याची आग्रही मागणी प्रविण दरेकर यांनी यावेळी पोलिस अधीक्षकांकडे केली.

ससून रुग्णालयातील भेटीनंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की,न्हावले मधील घटना अतिशय गंभीर व भयंकर आहे. पुण्यात गेल्या काही महिन्यांमध्ये महिला अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे पुणे प्रशासनाने अशा घटनांची तातडीने दखल घेण्याची गरज आहे. हाथरसच्या घटनेचा बोलबाला देशभर करणारे आता कुठे झोपले आहेत. हाथरस सारख्या घटना रोज मुंबई व महाराष्ट्रात घडत आहेत, परंतु हाथरसच्या घटनेचे राजकारण झाले. पण आता या शिरुरच्या घटनेमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न एरणीवर आला आहे व हा प्रश्न सरकारने सोडविला पाहिजे. नाही तर रोज शिरुरसारख्या घटनेप्रमाणे महिलांना अत्याचारांच्या प्रसंगांना सोमोरे जावे लागेल, अशी चिंताही दरेकर यांनी व्यक्त केली.

पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांची या प्रकरणांसदर्भात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या निर्दयी घटनेतील नराधमांना तात्काळ अटक करा. पुण्यामध्ये महिला अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पुण्यासारख्या सांस्कृतिक वैभव असणा-या शहराला असे प्रकार शोभणारे नाही. पोलिसांचा धाक दरारा संपला आहे. सरकार पण सध्या सत्तेच्या मस्तीत आहे.त्यांना अश्या महिला अत्याचाराच्या गंभीर घटनांकडे बघायला वेळ नाही अशी टाकाही दरेकर यांनी केली.

त्या पडित महिलेवर तातडीने योग्य उपचार करुन तिला तिची गेलेली दृष्टी पुन्हा कशी मिळेल यासाठी प्रयत्न करण्याच्या व त्या महिलेवर सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना रुग्णालयचे डिन डॉ.तांबे यांना दिल्या आहेत. भाजपच्यावतीने या पिडित महिलेला व तिच्या कुटुंबियांला नक्कीच न्याय मिळवून देऊ. पण घडलेला प्रकार अतिशय निर्दयी आहे. त्यामुळे या प्रकरणातील नराधामांना तात्काळ अटक करण्याची मागणी पोलिस अधिक्षक अभिवन देशमुख यांच्याकडे दरेकर यांनी केली आहे.

यावेळी देरकर यांनी पिडित महिलेच्या कुटुंबियांचीही भेट घेतली व त्यांना धीर दिला. यावेळी भाजपचे पुणे शहर अध्यक्ष व माजी आमदार जगदीश मुळीक तसेच भाजपचे पुणे ग्रामीण अध्यक्ष गणेश भेगडे आदी उपस्थित होते.