उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांची प्रकृती चिंताजनक

0
341

लखनऊ, दि. १२ (पीसीबी) : उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय. आझम खान यांच्यासाठी पुढील 48 तास अत्यंत महत्वाचे आहेत. या काळात त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली तर काळजीचं कारण नाही, अशी माहिती लखनऊच्या मेदांता रुग्णालयाचे मेडिकल डायरेक्टर डॉ. राकेश कपूर यांनी दिली आहे. आझम खान आणि त्यांच्या मुलाला 9 मे रोजी सीतापूर कारागृहातून बाहेर काढत मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या मुलाची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.

आझम खान यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं तेव्हा त्यांना प्रति तास 4 ते 5 लीटर ऑक्सिजनची गरज होती. त्यांच्या बाय लॅटरल लंग्जमध्ये कोरोना निमोनियाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. 2 दिवसानंतर त्यांचा आजार बळावल्यानंतर आणि ऑक्सिजनची गरज अधिक वाढल्यानंतर कोविड वॉर्डातील ICU मध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. आज त्यांची ऑक्सिजनची गरज कमी झालीय. ते जेवणही करत आहेत. मात्र त्यांना संसर्ग अधिक आहे. त्यावेळी आझम खान यांच्यासाठी पुढील 72 तास महत्वाचे आहे. या काळात त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली तर पुन्हा चिंता नसेल, असं डॉक्टरांनी म्हटलंय.

तुरुंगात कोरोनाची लागण
आझम खान सध्या उत्तर प्रदेशातील सीतापूर तुरुंगात कैद आहेत. त्यांच्यावर 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. आझम खानसोबत तुरुंगात कैद आणखी 13 कैद्यांनाही कोरोना संसर्ग झाल्याचं नुकतंच समोर आलं होतं. आझम खान तुरुंगातही रमझानचे रोजे ठेवत होता. मात्र प्रकृती बिघडल्यानंतर आझम खान यांनी रोजे ठेवणेही बंद केल्याची माहिती तुरुंग प्रशासनाने दिली होती.