‘तू येथून का जातो, येथून जायचा रस्ता आहे का’ असे म्हणत तरुणास मारहाण

0
287

तळेगाव दाभाडे, दि. ७ (पीसीबी) – शाळेच्या कंपाऊंड जवळून गेल्याच्या कारणावरून कंपाऊंडचे काम करणाऱ्या चार जणांनी मिळून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 6) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील वराळे येथे घडली.

अक्षय रामदास काळे (वय 27, रा. वराळे, ता. मावळ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शाळेच्या कंपाउंडचे काम करणारा मिस्तरी, लेबर, आदेश मराठे आणि आदेश मराठे याचा मित्र यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वराळे येथे भैरवनाथ विद्या मंदिर शाळेच्या कंपाऊंडचे काम सुरू आहे. तिथून फिर्यादी अक्षय काळे रविवारी दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास जात होते. त्यावेळी ‘तू येथून का जातो. येथून जायचा रस्ता आहे का’ असे म्हणत आरोपींनी अक्षय यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून जखमी केले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.