तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत असलेले सिवानचे माजी खासदार शहाबुद्दीन यांचे कोरोनामुळे निधन

0
368

पटना, दि.०२ (पीसीबी) : राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार आणि बाहुबली नेते मोहम्मद शहाबुद्दीन यांचे कोरोना निधन झाले. बिहारच्या सीवान लोकसभा मतदार संघातील खासदार असलेले शहाबुद्दीन यांनी दिल्लीच्या दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. शहाबुद्दीन तिहार तुरूंगात शिक्षा भोगत होते. दरम्यान, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, त्यानंतर त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथेच त्याचा मृत्यू झाला. तिहार जेलच्या आयजींनी याची माहिती दिली आहे.

आज सकाळपासूनच या बाहुबली नेत्याच्या मृत्यूच्या बातमी बद्दल शंका व्यक्त होत होती. दरम्यान, तिहार जेलचे आयजी संदीप गोयल यांनी आरजेडीचे माजी खासदार यांच्या निधनाची बातमी दिली आहे. बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी शहाबुद्दीन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केले आहे. त्यांनी केलेल्या ट्वीट मध्ये म्हंटले कि, “माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या कोरोना संसर्गामुळे झालेल्या अकाली निधनाची दुखद बातमी वेदनादायक आहे. देव त्यांना स्वर्गात स्थान देईल, कुटूंब आणि हितचिंतकांना आधार देईल. त्यांचा मृत्यू पक्षाला न भरून निघणारा तोटा आहे. अशा कठीण समयी , आरजेडी कुटुंब शोकग्रस्त कुटुंबासमवेत आहे.”