‘तालिबान राज’: तालिबान्यांनी बदललं अफगाणिस्तानचं नाव? जसा नवा राष्ट्रपती तस नवं नाव. आता…

0
724

काबुल, दि.१९ (पीसीबी) : तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर आता अनेक वादग्रस्त निर्णय घेण्यास सुरुवात केलीय. महिलांवरील निर्बंधांसोबतच तालिबान्यांनी आता अफगाणिस्तानचं नवं नाव ठेवल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे हेच नाव तालिबानने 1996-2001 मधील आपल्या राजवटीतही दिलं होतं. मात्र, नंतर अमेरिकेसह नाटोच्या सैन्याने तालिबानचा पराभव करत नावात बदल केला. आता पुन्हा अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर तालिबानचा प्रमुख नेता मुल्ला अब्दुल बरादरने अफगाणिस्तानचं नाव अस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान असं ठेवलंय.

तालिबानच्या ताब्यानंतर राष्ट्रपती अशरफ गनी हे आपल्या कॅबिनेट मंत्र्यांसह देश सोडून गेले. त्यामुळे आता तालिबनाचा महत्त्वाचा नेता असलेला मुल्ला अब्दुल गनी बरादर हा नवा राष्ट्रपती होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे नवा राष्ट्रपती थेट अफगाणिस्तानचं नाव बदलून ‘इस्लामिक अमीरात ऑफ अफगाणिस्तान’ हे नाव ठेवणार आहे.