तानाजी सावंतांचा पत्ता कट, अजित पवार होणार उपमुख्यमंत्री?

0
460

मुंबई, दि.३० (पीसीबी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकासआघाडी (शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस) सरकारचा आज, सोमवारी दुपारी एक वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. कायद्यानुसार राज्यात मुख्यमंत्र्यांसह ४३ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ करता येते. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह सात जणांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे आणखी ३६ जणांचा समावेश करता येईल. तिन्ही पक्षांनी आपापसांत कोणती खाती वाटून घ्यायची हे निश्चित झाले असले तरी पक्षांतर्गत खातेवाटपाचा घोळ मात्र रात्री उशिरापर्यंत सुरू होता. संभावित यादी समोर आली असली तरी कोणाला मंत्रीपद मिळणार? कोणाला डावलणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

अजित पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून समोर आलेल्या कॅबिनेट मंत्र्यांच्या यादीत अजित पावर यांचं नाव अग्रस्थानी आहे. ज्या गृहमंत्रिपदावरून तू तू मै मै सुरु आहे ते राष्ट्रवादीकडे जाऊन अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह गृहमंत्रीपदाची जबाबदारी येण्याची दाट शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.