तळेगाव येथे कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; तर दोघे गंभीर

0
558

तळेगाव, दि. २ (पीसीबी) – भरधाव कारने दिलेल्या जोरदार धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या एका दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी (दि.३०) रात्री पावणेदहाच्या सुमारास आंबी गावच्या हद्दीतील डी.वाय.पाटील कॉलेजजवळ घडली.

पंडीत निवृत्ती बेवनाळे (वय ४१, रा. देहुगाव) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर इब्राहिम वजीर शेख (वय ३४) आणि शेख पाशा शेख उमर (वय ३९, दोघे रा. सहारा ट्रान्सपोर्ट, निगडी) असे जखमी दोघांची नावे आहेत. याप्रकरणी वेरना कार (क्र.एमएच/१४/डीएफ/६७२०) वरील अज्ञात चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास आंबी गावच्या हद्दीतील डी.वाय.पाटील कॉलेजजवळून इब्राहिम शेख आणि शेख पाशा हे त्यांच्या दुचाकीवरुन तर पंडीत बेवनाळे हे त्यांच्या दुचाकीवरुन चालले होते. यावेळी भरधाव वेरना कार (क्र.एमएच/१४/डीएफ/६७२०) वरील अज्ञात चालकाने पंडीत आणि इब्राहिम या दोघांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये ते तिघेही जखमी झाले. तर पंडीत यांचा मृत्यू झाला. तसेच ती वेरना कार पुढे जावून पलटी झाली. याप्रकरणी आरोपी कारचालकाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.