…तर ही गर्दी झाली नसती, वांद्य्रातील घटना चिंताजनक – चंद्रकांत पाटील

0
284

 

मुंबई, दि.१५ (पीसीबी) – कोरोना व्हायरसमुळे लावलेला लॉकडाऊन संपल्यावर घरी जायला मिळेल, या आशेने हजारो मजूर सकाळपासून मुंबईतल्या वांद्रे स्टेशनवर जमले होते.त्यामुळे या स्थलांतरितांची तारांबळ उडाली आहे. आपल्या गावी परत जाण्याची ओढ आणि कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव यात अडकलेल्या मजुरांना आता कसे इथून हटवावे, हा मोठा प्रश्न प्रशासनासमोर उभा झाला आहे. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. ३ मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतेही आस्थापना सुरु राहणार नाही. रेल्वेनेही ३ मे पर्यंत प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे अनेक ठिकाणी मजुरांचा आक्रोश पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थलांतरी कामगारांना महाराष्ट्रातच राहा असे आवाहन केले आहे. तसेच सर्व सुविधा पुरवण्याचे आश्वासनही दिले आहे. आपण भारताचे नागरिक आहात आणि आपण आता आहात तिथेच थांबावं असं त्यांनी आव्हान केले आहे. तसेच बाहेर राज्यातील मराठी नागरिकांनी आहेत तिथेच थांबावे असेही ठाकरे म्हणाले.