…तर सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा – चंद्रकांत पाटील

0
549

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाला, तर मग बारामतीची जागा कशी काय जिंकून आली? त्याचबरोबर जर खरेच घोटाळा झाला असे वाटत असेल, तर बारामतीमधून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार  सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा,  अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

गोरेगाव येथे आज (रविवार) भाजपच्या कार्यसमितीची बैठक सुरू आहे.  यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवले आहे. परंतु विरोधक हे यश इव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केल्याने मिळाले आहे,  असा आरोप  करत आहे.  जर ईव्हीएममध्ये घोटाळा झाला,  तर मग बारामतीची जागा कशी काय जिंकून आली?

त्याचबरोबर जर खरेच घोटाळा झाला असे वाटत असेल, तर बारामतीमधून निवडून आलेल्या सुप्रिया सुळे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा,  अशी मागणी पाटील यांनी केली. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकारिणीच्या  बैठकीत पक्ष पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.