…तर सरपंच खासदारापेक्षाही सरस ठरेल – संजय राऊत

0
666

नाशिक, दि. २२ (पीसीबी) – ग्रामपंचायतीचा कारभार हाकताना विकासाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. पंचायती राजकारणाचा अड्डा होता कामा नाही. सरपंचांनी निष्पक्षपणे विकास कामे केल्यास सरपंच खासदारापेक्षाही सरस ठरेल, असे मत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. 

नाशिक मध्ये शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या सहकार्याने एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या वतीने नाशिक लोकसभा मतदारसंघातील सरपंचांची  ‘सरपंच संसद’ आयोजित केली होती. यावेळी राऊत बोलत होते.

ज्यांनी सरपंचपदावर आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे. ते पुढे खासदार झाले आहेत. त्यांनी मंत्रिपदही भूषवले आहे. त्यांनी आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. सरपंच पदावर काम केल्याने त्यांना सर्व प्रश्नांची चांगली जाण असते. ग्रामपंचायतीपासून राजकारणातील सर्व पायऱ्या चढल्या की, चांगले काम होऊ शकते. सरपंच प्रशिक्षित असल्यास आदर्श गावे तयार होतील. त्यासाठी स्पर्धा घेण्याची गरज भासणार नाही, असे राऊत यावेळी म्हणाले.