#metoo: दहा-पंधरा वर्षाने बोंबलणे चुकीचे- सिंधुताई

0
1414

नगर, दि. २२ (पीसीबी) – राजकारण आणि बॉलिवूडमध्ये वादळ निर्माण करणाऱ्या ‘मी टू’ मोहिमेवर ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी टीकास्त्र सोडले आहे. अत्याचार झाला तेव्हाच आवाज का उठवला जात नाही. दहा-पंधरा वर्षाने बोंबलणे चूकच आहे. त्यामुळे निर्दोषही भरडले जातील, अशी टीका सिंधुताईंनी केली आहे.

अहमदनगर जिल्ह्याततील लाडजळगाव येथे एका कार्यक्रमाला आले असता प्रसारमाध्यमांशी बोलताना सिंधुताई सपकाळ यांनी ही टीका केली. ‘मी टू’ची मोहीम अत्यंत वाईट आहे. त्यामुळे निर्दोष लोकांनाही शिक्षा भोगावी लागते, असे सांगतानाच अत्याचाराला दहा वर्षानंतरच वाचा कशी फुटू शकते? अत्याचार झाला तेव्हाच का बोलले जात नाही? असा सवालही त्यांनी केला. जेव्हा काळजात कळ येते तेव्हा माणूस मुका राहूच शकत नाही, असेही त्या म्हणाल्या.