…तर वाघिणीच्या मृत्युप्रकरणी उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमू – सुधीर मुनगंटीवार

0
765

चंद्रपूर, दि. १० (पीसीबी) – वाघिणीच्या मृत्यूप्रकरणी काही चुकीचे किंवा शंकास्पद असेल, तर आम्ही शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमू, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. उद्धवजी युती सरकारचे महत्वाचे नेते आहेत. चौकशी समितीचे प्रमुखपद त्यांनी न स्वीकारल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या पाच निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी समिती नेमण्याची विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आहे. विनाकारण यात हीन दर्जाचे राजकारण केले जात आहे,’ असेही ते म्हणाले.  

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी तस्करांसोबत जोडलेले माझे संबंध म्हणजे राजकीय हीनता आहे. इतक्या खालच्या स्तराला जाऊन तथ्यहीन आरोप मी आजवर राजकीय आयुष्यात बघितले नाहीत. सत्याचा निर्घृण खून निरुपम यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर चंद्रपूर जिल्ह्यात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.