तर तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतके पेट्रोल महाग होईल; सौदीचा इशारा

0
621

रियाध, दि. ३० (पीसीबी) – सौदी अरबचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी इराणविरोधात जागतिक कारवाईचा मागणी केली आहे. तसेच, कल्पनाही करू शकणार नाही इतकी कच्चा तेलाची किंमत वाढेल, असा इशाराही देखील त्यांनी दिला आहे.

बिन सलमान यांनी १४ सप्टेंबर रोजी सौदीतील दोन तेल उत्पादन केंद्रावर झालेल्या हल्ल्यास इराणला जबाबदार ठरवले आहे. ज्यामुळे सौदीतील तेल उत्पादनात निम्मी घट झाली व कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

प्रिन्स बिन सलमान यांनी म्हटले की, जर जगाने इराणविरोधात कठोर भूमिका घेतली नाही. तर, आम्ही पुढचे पाऊल उचलु ज्यामुळे जागतिक हिताला धोका निर्माण होऊ शकतो. याचा तेल पुरवठ्यावर परिणाम होईल व तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतकs तेल महाग होईल. तसेच, सौदी आणि इराणमध्ये जर युद्ध झाले तर जागतिक अर्थव्यवस्था कोलमडून पडेल, म्हणूनच आपण यासंदर्भात सैन्य बळाचा वापर करण्यापेक्षा राजकीय तोडगा काढणे अधिक पसंत करत आहोत, असेही प्रिन्स सलमान यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या तासभराच्या मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.

अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन यांनी हल्ल्याच्या मागे इराणचा हात आहे, या सौदीने केलेल्या आरोपास पाठिंबा दिला आहे. शिवाय हल्ल्याची जबाबदारी स्वीकरलेल्या हुथी बंडखोरांचा विरोधही केला आहे. इराणच्या हुथी बंडखोरांनी अबाकिक आणि खुराइस या दोन ठिकाणच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर ड्रोनमधून हल्ले केले होते.