“… तरी एकनाथ खडसे भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही”

0
244

मुंबई,दि.२३(पीसीबी) – एकनाथ खडसेंना कोणत्याही पक्षाने, कितीही मोठी ऑफर दिली, तरी ते भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही, असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

“मी १९८० पासून भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांच्याशी अनेकदा बैठकीत, वैयक्तिक, प्रत्यक्ष संपर्क आला. त्यांची वैशिष्ट्यं, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू मी समजून घेतले आहेत. ते कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेते आहेत. जिना यहा मरना यहा इसके सिवा जाना कहा, काही घटनांबद्दल मनामध्ये दु:ख असू शकते. पण कार्यकर्ता म्हणून एक विश्वास आहे की खडसे हे भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

“दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरीही खडसेंचा डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही, प्रतिबंध घालतो. त्यामुळे खडसेंच्या मनाला दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचारच शिवू शकत नाही. हा विचार माझ्याही मनात शिवू शकत नाही आणि त्यांच्या मनात हा विचार येऊ शकत नाही.” असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

दरम्यान “माझ्या आयुष्यात राजकारणाची थोडी किंवा व्यक्ती समजण्याची थोडी तरी समज असेल, तर खडसे दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही,” असेही मुनगंटीवारांनी सांगितले.