ड्रायव्हरला कोरोना, विभागीय आयुक्त होम क्वारंटाईन

0
388

पुणे, दि १४ (पीसीबी) : पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दीपक म्हैसेकर स्वत: होम क्वारंटाईन झाले आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. महसूलचे बहुसंख्य अधिकारी रुग्णांलयांचे नियोजन, व्यवस्था पाहण्तायात व्यस्त असल्याने त्यांना थोडी खबरदारी घेतली पाहिजे, असे सांगण्यात आले. 

पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या ड्रायव्हरने कोरोना चाचणी केली होती. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर दीपक म्हैसेकर यांनी खबरदारी म्हणून घरीच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. म्हैसेकर हे कोरोनाच्या काळात पहिल्या दिवसांपासूनच फिल्डवर काम करत आहे. कोरोनाच्या सुरुवातीला डॉ.दीपक म्हैसेकर यांनी कोरोनापासून कशी काळजी घ्यायची, कोरोना रुग्णांची संख्या याबाबतची माहिती सातत्याने पत्रकार परिषदेतून देत होते.

पुण्यात विभागीय आयुक्तांच्या नियंत्रणात कोरोना रोखण्याबाबत रणनिती आखली जात आहे. कोरोना नियंत्रणाच्या सर्व बैठका दीपक म्हैसेकर यांच्या उपस्थितीत पार पडत आहेत. कालही म्हैसेकरांनी पुणे व्यापारी महासंघाच्या बैठकीत हजेरी लावली होती. या बैठकीला व्यापारी महासंघाच्या अध्यक्षांसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तसह डझनभर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या सर्व अधिकाऱ्यांचे वाहनचालक एकमेकांच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.