डॉ. सुजय विखे-पाटील यांच्याविषयी अण्णा हजारे म्हणतात

0
613

अहमदनगर, दि. १७ (पीसीबी) – नगरमध्ये  विखे पाटील घराण्याला राजकारणाबरोबर समाजकारणाचीही मोठी परंपरा आहे. डॉ. सुजय विखे नगर लोकसभेचे उमेदवार आहेत, त्यापेक्षा ते विखे घराण्याचे तरुण सदस्य आहेत, याचे मला  अधिक आकर्षण आहे.  त्यांच्या पणजोबांपासून  चालत आलेली परंपरा पुढे नेत ते काहीतरी वेग‌ळे काम करून दाखवतील, अशी  त्यांच्याकडून अपेक्षा आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

भाजपमध्ये प्रवेश केलेले डॉ. सुजय विखे यांनी  शनिवारी  अण्णांची भेट घेतली. या भेटीनंतर  अण्णा पत्रकारांशी बोलत होते.

अण्णा  म्हणाले की, निवडणुकीतील उमेदवार  मतदारांना भेटण्यासाठी येतातच. त्याच नात्याने डॉ. विखे भेटण्यासाठी आले होते.  यावेळी राजकीय काही बोलणे झाले नाही. मात्र, सुजय यांच्याबद्दल युवा म्हणून आपल्याला आकर्षण वाटते. युवाशक्ती पुढे आली तर देशासाठी काही वेगळे करू शकते, असे अण्णा म्हणाले.