डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण: चिंचवड येथील अमोल काळेला पुण्याच्या न्यायालयात हजर करणार

0
790

पुणे, दि. ६ (पीसीबी) – पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील प्रमुख आरोपी अमोल काळेचा सीबीआय पथकाने बुधवारी (दि.५) बंगळूर येथील तुरुंगातून ताबा घेतला. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांडातही तो मास्टरमाइंड असावा असा सीबीआयच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. यामुळे आज (गुरुवार)अमोल काळेला पुण्यातील न्यायालयात हजर केले जाणार आहे.

अमोल अरविंद काळे मुळचा चिंचवडचा असून त्याला कर्नाटकातील दावणगिरी येथून विशेष पथकाने (एसआयटी) ताब्यात घेतले. त्यावेळी बंगळुरू येथील पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणात त्याचा संबंध असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते. डॉ. दाभोलकर हत्याकांडातील संशयित सचिन अंदुरे आणि अमोल काळे यांची औरंगाबादमध्ये भेट झाली होती. औरंगाबादमधील वास्तव्यादरम्यान काळे याने अंदुरेला एक पिस्तूल दिले होते. दरम्यान, काळेने अंदुरेकडे दिलेल्या पिस्तुलाबाबतचा अहवाल अजूनही प्रलंबित आहे. यामुळे आज अमोल काळेला पुण्यातील न्यायालयात हजर केल्या नंतर न्यायालय कायद निर्णय देणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.