डी.एस.के प्रकरणात १६०० पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

0
814

पुणे, दि. १३ (पीसीबी) – डी एस के प्रकरणात आज (सोमवार) पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेने १६०० पानी पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांच्या न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

शिरीष कुलकर्णी, अनुराधा पुरंदरे, विनय बडगंडी, केदार वांजपे, सई वांजपे, धनंजय पाचपोर यांच्या विरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून आत्तापर्यंत डी एस के प्रकरणात एकूण २०९१  कोटींची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाली आहे.

बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे समोर आले असून या प्रकरणी त्यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करत कुलकर्णी यांना अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी डीएसके यांची पुतणी सई वांजपे, तिचा पती केदार वांजपे, डीएसके कंपनीचा सीईओ धनंजय पाचपोर, फायनान्स हेड विनयकुमार बंडगंडी, मुलगा शिरीष कुलकर्णी,मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना देखील अटक केली होती.