ठाकरेंच्या शिवसेनेची गळती थांबता थांबेना, माजी मंत्री बबन घोलप यांचाही जय महाराष्ट्र

0
203

नाशिक, दि. १५ (पीसीबी) – आदित्य ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या बांधणीसाठी नाशिक दौऱ्यावर असतानाच त्यांना मोठा धक्का बसला. माजी मंत्री आणि उपनेते बबन घोलप यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केले आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तसेच अन्य काही कारणे देत घोलप यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपल्या राजीनामा पाठविला आहे. या राजीनामाचे पत्र त्यांनी सोशल मीडियावर देखील व्हायरल केले आहे. घोलप यांचा हा राजीनामा अपेक्षितच असून गेल्या काही दिवसांपासून शिर्डी मतदार संघाच्या पक्षांतर्गत राजकारणावरून पक्षाचे वरिष्ठ नेते आणि घोलप यांच्या दुरावा निर्माण झाला होता.

आपण गेली 25 वर्ष प्रामाणिकपणे पक्षासाठी काम केले आहे. उपनेते तसेच पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या मनापासून काम करून यशस्वी केल्या आहेत. मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघात निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बाजूला करून नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. जुन्या पदाधिकाऱ्यांबाबत मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघ प्रमुखांकडून तक्रारी होत्या. असे असतानाही पुन्हा त्याच पदाधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आले, अशी नाराजी घोलप यांनी व्यक्त केली.

घोलप म्हणतात, एकनिष्ठ शिवसैनिक अमर कतारी याला देखील कोणतीही नियुक्ती न देता संघटनेपासून लांब ठेवले आहे. विकाऊ आणि बिनकामाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्त केल्याने त्याबाबत वरिष्ठांकडे कळूनही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे वेतन आपण राजीनामा देत आहोत.
शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी शिर्डी मतदार संघात दौरा केला. त्यापाठोपाठ आदित्य ठाकरे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात संवाद मिळावे घेतले होते. दोन्ही कार्यक्रमांना बबनराव घोलप आणि उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमात माजी महापौर नयना घोलप, माजी आमदार योगेश घोलप देखील अनुपस्थित होते. त्यामुळे घोलप यांच्या पक्षाकडून काही निर्णय होण्याआधीच त्यांनी राजीनामा दिला आहे.

घोलप यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली होती. या बैठकीत चर्मकार संघाच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. मात्र पडद्यामागे शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध एकनाथ शिंदे गट या राजकारणातील डाव मांडण्यात आले होते. शिंदे गटाकडून नाशिकमध्ये माजी मंत्री घोलप आणि त्यांचे पुत्र माजी आमदार योगेश घोलप गळायला लागल्याने ठाकरे गटाला सावरण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. या प्रवेशामुळे शिंदे गटाकडून घोलप अथवा त्यांचे पुत्र यापैकी एकाची चर्मकार उद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.