टेम्पोच्या धडकेत ट्रकच्या क्लीनरचा मृत्यू

0
422

सोमाटणे, दि. २१ (पीसीबी) – ट्रकच्या टायरमधून आवाज येत असल्याने टायर चेक करण्यासाठी खाली उतरलेल्या क्लीनरला एका टेम्पोने धडक दिली. यामध्ये क्लीनर 50 फूट अंतरापर्यंत घासत गेला. यामध्ये क्लीनरचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 20) पहाटे चार वाजता पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Express Way) सोमाटणे गावाच्या हद्दीत घडली.

मधुगोडा परशुराम भोसले असे मृत्यू झालेल्या क्लीनरचे नाव आहे. याबाबत बाळकृष्ण शुबराव चव्हाण (वय 25, रा. कोणतेव बोबलाद, ता. जत, जि. सांगली) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टेम्पो (एम एच 47 / वाय 0230) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाळकृष्ण आणि त्याचा क्लिनर हे दोघे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून ट्रक (के ए 23 / बी 2769) घेऊन जात होते. सोमाटणे गावच्या हद्दीत आल्यानंतर ट्रकमधून आवाज येऊ लागला. त्यामुळे बाळकृष्ण यांनी ट्रक बाजूला घेऊन थांबवला. आवाज कशाचा येत आहे, हे चेक करण्यासाठी क्लीनर भोसले खाली उतरला. ट्रकचे टायर चेक करत असताना अचानक भरधाव वेगात मागील बाजूने एक टेम्पो आला. त्याने जोरात क्लीनरला धडक दिली. या धडकेत क्लीनर सुमारे 50 फूट अंतरापर्यंत घासत गेला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. आरोपी टेम्पो चालक अपघाताची माहिती न देता पळून गेला. तळेगाव दाभाडे पोलीस