टिकटॉक अॅप वापरणाऱ्यांनो सावधान: टिकटॉकचा गैरवापर करु नका नाही तर खावी लागेल जेलची हवा

0
1973

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – काळानुरुप तंत्रज्ञान बदलत चालले आहे आणि त्यातूनच वाढत आहे त्यांचा गैरवापर. आज आपण स्मार्टफोन मधील विविध अॅप हे काम किंवा मनोरंजनासाठी वापरतो. मात्र काही लोक याचा गैरफायदा घेऊन राजकीय नेते, महिला आणि तरुणींची बदनामी करण्यासाठी याचा उपयोग करतात. यामुळे आत्महत्या, हत्या या सारखे गंभीर गुन्हे घडतात. या घटनांची गंभीर दखल घेत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी शहर परिसरात टिकटॉक अॅपचा वापर करुन त्याचा गैरउपयोग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली आहे.

मुख्यता तरुणांमध्ये टिकटॉक अॅपची क्रेज आहे. या अॅपचा उपयोग करुन विविध गाण्यांवर तरुण स्वत:चा किंवा मित्रांचा व्हिडीओ तयार करतात तो फेसबुक, ट्विटर अशा विविध सोशल माध्यमातून शेर करतात. कधी हे मजा म्हणून तर काही गुन्हेगार प्रवृत्तीचे तरुण त्याचा इतरांची बदनामी करण्यासाठी वापरतात. यामुळे हत्या आणि आत्महत्या घडतात. काही दिवसांपूर्वी शहरातील एका विद्यार्थीनीचा काही तरुणांनी टिकटॉक व्हिडीओ तयार करुन तिची बदनामी केली होती. तर चिखली येथील एका विवाहित तरुणीने तिच्या पतीला कॅन्सर झाल्याचा टिकटॉक व्हिडीओ तयार करुन विविध सोशय माध्यमांवर शेर केला होता. यामुळे तिच्या पतीने आत्महत्या केली होती. तर काही दिवसांपूर्वी शहरातील तरुण चालू रस्त्यात टिकटॉक व्हिडिओ तयार करत होते. यामुळे वाहतुकीला अडथला निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता होती.

यामुळे अशा प्रकारांच्या गुन्ह्यांवर आळा बसावा म्हणून पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच टिकटॉक अॅपचा गैरवापर करुन गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कडक कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.