झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मुस्लिम असल्याने ऑर्डर रद्द

0
429

नवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) – हिंदू-मुस्लिम या दोन समाजातील द्वेष किती टोकाला गेला आहे, याचा प्रत्यय नुकताच आला आहे. झोमॅटोवरून जेवणाची ऑर्डर केल्यानंतर मेसेज आला. त्यात डिलिव्हरी बॉय मुस्लिम दिसताच एका हिंदू व्यक्तीने जेवणाची ऑर्डर रद्द केली आहे. डिलिव्हरी बॉय बदला अन्यथा ऑर्डर रद्द करून पैसे परत द्या असे म्हणत त्या व्यक्तीने सोशल मीडियावर वाद घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

पंडित अमित शुक्ल यांनी झोमॅटोवरून जेवणाची ऑर्डर दिली होती. त्यानंतर त्यांना झोमॅटोचा मेसेज आला. मेसेजमध्ये डिलिव्हरी बॉय मुस्लिम असल्याने पंडित शुक्ल यांनी झोमॅटोला डिलिव्हरी बॉय बदलण्याची मागणी केली. जर डिलिव्हरी बॉय बदलत नसाल तर माझे पैसे परत करा, असे म्हणत कंपनीसोबत वाद घातला. यासंबंधीची पोस्ट सुद्धा पंडित शुक्ल यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. ट्विटमध्ये म्हटलंय की, मी झोमॅटोवरून जेवणाची ऑर्डर रद्द केलीय. कारण, झोमॅटो मला एका मुस्लिमाच्या हस्ते जेवण पाठवणार होते. मी डिलिव्हरी बॉय बदलण्यास सांगितले. परंतु, त्यांनी तसे करण्यास नकार दिला. मुस्लिमाच्या हातून आलेले जेवण खाण्यासाठी तुम्ही माझ्यावर दबाव टाकू शकत नाही, तसेच मला रिफंडची गरज नाही, असे मी त्यांना सांगितले, असे शुक्ल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.