झाडांना पाणी देताना अंगावर पाणी उडाल्याने महिलेला केली बेदम मारहाण

0
187

सांगवी, दि. १३ (पीसीबी) – घरासमोर असलेल्या झाडांना पाणी देत असताना दोन महिलांच्या अंगावर पाणी उडाले. त्यावरून दोन महिलांनी पाणी देणा-या महिलेला बेदम मारहाण केली. ही घटना 8 एप्रिल रोजी सायंकाळी जगताप नगर, पिंपळे सौदागर येथे घडली. भीमाबाई वाघमारे, आरती गायकवाड (दोघी रा. जगताप नगर, पिंपळे सौदागर) अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. याबाबत पूनम नितीन जगताप (वय 37, रा. जगताप नगर, पिंपळे सौदागर) यांनी सोमवारी (दि. 12) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगताप त्यांच्या घरासमोरील झाडांना 8 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास पाणी टाकत होत्या. त्यावेळी ते पाणी आरोपी महिलांच्या अंगावर उडाले. त्यावरून आरोपी भीमाबाई या महिलेने फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने पाठीवर, मानेवर, पायावर मारहाण केली. तर आरोपी आरती या महिलेने लोखंडी पट्टीने फिर्यादी यांना पायावर, पाठीवर, मानेवर मारले. त्यानंतर शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.