ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन

0
453
पुणे, दि,१७ (पीसीबी) – मराठी चित्रपट सृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. पुण्यामध्ये आज (मंगळवारी) पहाटे त्यांचे निधन झाले.ते ८८ वर्षांचे होते.  दुपारी बारा वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
जयराम हे अभिनेत्री मृणाल कुलकर्णींचे सासरे होते. जयराम कुलकर्णी यांच्यामागे पत्नी डॉ. हेमा कुलकर्णी, मुलगा रुचिर आणि सून मृणाल असा परिवार आहे.