कोणत्याही शहराला लॉकडाऊन करणार नाही. मात्र सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी – मुख्यमंत्री

0
404

मुंबई,दि.१७(पीसीबी) – कोणत्याही शहराला लॉकडाऊन करणार नाही. मात्र सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असं शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

कोरोना व्हायरसचा फैलाव वाढत असल्याने राज्य सरकारने मोठा निर्णय घेत महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय सर्व परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी सूचना कुलगुरु आणि संबंधित विभागांना देण्यात आली असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. आपल्यासाठी पुढचे पंधरा ते सोळा दिवस जास्त महत्त्वाचे आहेत. शासनाच्या संपर्कात राहा. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका त्यासोबत सर्व नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

दरम्यान, येत्या दिवसात पुढचं मोठं दिवस संकट टाळण्यासाठी मंदिर, मस्जिद आणि चर्चमध्ये गर्दी करू नका. कोणत्याही शहराला लॉकडाऊन करणार नाही. मात्र सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.