जुन्नरमध्ये गणेश विसर्जना दरम्यान तीन शाळकरी मुलांचा मृत्यू

0
547

पुणे, दि. २४ (पीसीबी) –  जुन्नर तालुक्यातील कावळ पिंपरी या गावात गणेश विसर्जना दरम्यान तीन मुलांचा तळ्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.२३) सायंकाळच्या सुमारास घडली.

गणेश नारायण चक्कर ( वय ९), सुमित सावकार पाबळे ( वय ११ ), वैभव विलास पाबळे ( वय ११) अशी बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळच्या सुमारास कावळ पिंपरी या गावातील पाच मुले गणेश विसर्जनासाठी गावजवळील तळ्यात उतरली होती.  या दरम्यान गणेश, सुमित आणि वैभव या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर दोघांना वाचवण्यात यश आले. तिघांचेही मृतदेह सापडले आहेत. या दुखद घटनेमुळे कावळ पिंपरी गावावर शोककळा पसरली आहे.