जिथं-जिथं काँग्रेसला अपयश आले आहे, तेथील प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे द्यावेत – अशोक चव्हाण

0
509

मुंबई,  दि. २५ (पीसीबी) – लोकसभेतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. देशात जिथं-जिथं काँग्रेसला अपयश आले आहे, तेथील सर्व प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे द्यावेत, असे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.  

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज (शनिवार) पहिल्यांदा अशोक चव्हाण यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, पराभवाची नैतिक जबाबदारी म्हणून मी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे. अन्य राज्यांतील प्रदेशाध्यक्षांनीही हीच भूमिका घ्यावी. जेणेकरून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाला तयारी करता येईल. तरुण नेत्यांना संधी देता येईल, असे चव्हाण म्हणाले.

काँग्रेसच्या पराभवाला पक्षाध्यक्ष  राहुल गांधी जबाबदार आहेत, असे म्हणणे चूक आहे. देशात सर्व ठिकाणी पक्षाचा पराभव झाला आहे. त्याची कारणमीमांसा पुढे होईलच. मात्र, राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये व दिला तरी स्वीकारला जाऊ नये, अशी भूमिकाही चव्हाण यांनी घेतली.