जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी ‘भरारी पुरस्कारा’ने महिलांचा सन्मान  

0
930

पिंपरी, दि. २० (पीसीबी) –  आपले सामाजिक दायित्व स्वीकारून वेगवेगळ्या क्षेत्रात कौतुकास्पद कार्य करणाऱ्या माता-भगिनींच्या कार्याचा सन्मान जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने ‘भरारी पुरस्कार’ देऊन करण्यात येणार आहे. हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम सोमवारी (दि. २१) दुपारी १ वाजता  चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे, अशी माहिती जिजाई प्रतिष्ठानच्या संस्थापिका व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा   सीमा सावळे यांनी दिली.

या कार्यक्रमास पिंपरी- चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष तथा चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकारणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड.सचिन पटवर्धन, पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे सरचिटणीस सारंग कामतेकर, भाजपच्या प्रांतिक पदाधिकारी उमा खापरे, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, माजी नगरसेविका गीता आफळे, अश्विनी जगताप आदी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी ऊर्मिला पाटील (स्कूल बस चालक),  मुन्नी पांडे ( कष्टकरी महिला कामगार), सारीका पवार (पापड केंद्र व्यावसायिका), मीना मस्के (शिक्षिका), उल्का कुटे (गृहिणी), निलीमा पाचपोर (शिक्षिका), इशा मुंशी (ब्युटी पार्लर व्यावसायिका) , सुजाता भोईटे (चपाती केंद्र व्यावसायिका),  शारदा रिकामे (योग प्रशिक्षिका) यांचा ‘भरारी’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.