जामखेड मध्ये भावाच्या मदतीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

0
463
संग्रहित
जामखेड, दि.१४ (पीसीबी) – १३ वर्षाची अल्पवयीन मुलगी दोन महिन्यांपूर्वी आजी आजोबांकडे आल्यानंतर शेतात जात असताना आरोपीने मोटारसायकलवर येऊन भावाच्या मदतीने तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत मुलगी ही दीड महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीच्या भावासह दोन जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेप्रकरणी एक अल्पवयीन मुलगा तर दुसरा विजय उर्फ दादा पोपट घुगे (वय २१ वर्षे. रा. आनंदवाडी )अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर आरोपी दादा पोपट घुगे याने दोन महिन्यांपूर्वी मुलीच्या घरी व त्या नंतर एक महिन्यापूर्वी पीडित अल्पवयीन मुलगी ही शेतात आपल्या आजी व आजोबांकडे जात आसताना भावाच्या मदतीने मोटारसायकलवर येऊन बलात्कार केला. अशा प्रकारे आरोपीने आपल्या भावाच्या मदतीने पीडित मुलीवर दोन वेळा अत्याचार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या भावांना मारुन टाकीन अशी धमकी दिली. त्यामुळे भीतीपोटी मुलीने दोन महीने होऊनही हा प्रकार कोणाला सांगितला नाही.
या नंतर दि ११ मार्च रोजी पीडित मुलगी ही घरात रडत आसताना तिला आईने का रडते असे विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. यानंतर मुलीस जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता सदर पीडित अल्पवयीन मुलगी ही दीड महिन्यांची गर्भवती आसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या नंतर दि १३ मार्च रोजी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीच्या भावासह दोन जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी यातील आरोपी विजय उर्फ दादा पोपट घुगे वय २१ वर्षे यास अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अवतारसिंग चव्हाण हे करत आहेत.