केंद्रात गो-गो म्हणून बघा कधी तुमचा खो-खो करतील तुम्हाला पण नाही समजणार – रूपाली चाकणकर

0
376

मुंबई,दि.१४(पीसीबी) – केंद्रात गो-गो म्हणून बघा कधी तुमचा खो-खो करतील तुम्हाला पण नाही समजणार, असं ट्विट करत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची खिल्ली उडवली आहे.

कोरोनाने जगभरात धूमाकूळ घातलेला असताना भारतातून कोरोना कायमचा हद्दपार व्हावा, यासाठी ‘कोरोना गो’ चा नारा आठवलेंनी दिला होता. त्यांच्या याच नाऱ्याची विरोधकांनी खिल्ली उडवली. रूपाली चाकणकर यांनीही आठवलेंना टोला लगावला आहे.

केंद्रात गो गो म्हणून बघा, कधी तुमचा खो-खो करतील हे तुम्हाला पण समजणार नाही, असं म्हणत त्यांनी रामदास आठवले यांना टोला लगावला आहे. तसंच तुमच्या बोलण्याला महाराष्ट्रात तरी अर्थ नाही असं म्हणत महाराष्ट्रातलं सरकार ५ वर्ष टिकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.