उद्धव ठाकरे सुद्धा मालामाल! जाणून घ्या ठाकरेंच्या मालमत्तेचा तपशील

0
430

मुंबई, दि. १२ (पीसीबी) : आजवरच्या लोकसभा- विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रामुळे कोणत्या राजकीय नेत्याकडे किती मालमत्ता आहे ते पाहून जनतेचे डोळे पांढरे होत होते. मात्र, ठाकरे यांच्याबाबतीत ही वेळ कधी आली नव्हती.

संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीचे आकडे अखेर समोर आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसुध्दा अब्जोपती आहेत हे पाहून अनेकांना धक्का बसला. विधानपरिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी संपत्तीचे विवरण दिले आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडे १४३ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं जाहीर केलं. त्यांची पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य यांची मिळून सुमारे १८६ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे समजते.

स्वत:कडे एकही वाहन नाही, दोन घरं आहेत, एक फार्महाऊस आहे, तसंच विविध कंपन्यांच्या शेअर्समधून येणारा डिव्हिडंट हे उत्पन्नाचे स्त्रोत अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात दिल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे. उद्धव ठाकरे हे संपत्ती जाहीर करणारे दुसरे ठाकरे ठरले आहेत. त्याआधी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी संपत्ती जाहीर केली होती.

उद्धव ठाकरेंच्या प्रतिज्ञापत्रातील महत्त्वाचे मुद्यांमध्ये उद्योग व्यवसायाच्या कॉलममध्ये उद्धव ठाकरें नोकरी करतात असे दाखवले आहे, तर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावा उद्योग, व्यवसाय आहेत. ठाकरे यांच्या उत्पन्नाचा स्त्रोता मध्ये उद्धव ठाकरेंना पगारातून तसेच व्याज, बोनस, लाभांश, भांडवली नफा यातून पैसे मिळत असतात असे दाखवले आहे. त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना व्याज, भाडे, व्यावसायिक भागीदारी नफा यातून रक्कम मिळते.
उद्धव ठाकरेंची संपत्ती 76 कोटी 59 लाख 57 हजार 577, रश्मी ठाकरेंची संपत्ती ‬65 कोटी 09 लाख 02 हजार 79, हिंदू अविभक्त कुटुंब – 1 कोटी 58 लाख 14 हजार 395 अशी पती-पत्नीची एकूण १४३ कोटी २६ लाख ७४ हजार ७६३ रुपये मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात दाखविले आहे.

ठाकरेंच्या संपत्तीचं विवरण पुढीलप्रमाणे आहे…

  • उद्धव ठाकरे यांची संपत्ती (जंगम एकूण २४ कोटी १४ लाख ९९ हजार ५९३)
  • रश्मी ठाकरे यांची संपत्ती (जंगम ३६ कोटी १६ लाख ४३ हजार ४५५)
  • हिंदू अविभक्त कुटुंब (जंगम १ कोटी ५८ लाख १४ हजार ३९५)
  • रोख रक्कम मध्ये उद्धव ठाकरे यांच्या खिशात फक्त ७६ हजार ९२२ रुपये, रश्मी ठाकरे यांच्या पर्समध्ये ८९ हजार ६७९ रुपये शिल्लक दाखविली आहे.
  • बँक ठेवींमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे १ कोटी ६० ला९३ हजार ६७५ रुपये, रश्मी ठाकरे यांच्याकडे ३४ लाख ८६ हजार ५५९ तर हिंदू अविभक्त कुटुंबाचे ५६ लाख २१ हजार रुपये आहेत.
  • शेअर्स मध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे २१ कोटी ६८ लाख ५१ हजार, रश्मी ठाकरे यांच्याकडे ३३ कोटी ७९ लाख ६२ हजार ४६० आणि हिंदू अविभक्त कुटुंब २९ लाख ५८ हजार १४९ असे विविध कंपन्यांचे भाग दाखवले आहेत.
  • पोस्ट आणि विमा कंपन्यांतून उद्धव ठाकरे ३ लाख रुपये, रश्मी ठाकरे ३ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. सर्व एश्वर्य आहे, पण एकाच्याही नावावर एकही वाहन दिसत नाही.
  • सोने, चांदी, हिरे असे दागदागिने सुमारे पावणे दोन कोटींचे असल्याचे ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्यात उद्धव ठाकरेंच्या नावे २३ लाख २० हजार ७३६, रश्मी ठाकरे १ कोटी ३५ लाख २० हजार ९२९, तर हिंदू अविभक्त कुटुंब ५३ लाख ४८ हजार ३०५ असे दाखविले आहेत. विविध मिळकतींमधून मिळणारे व्याजात उद्धव ठाकरे यांना ५८ लाख ५७ हजार २५९, रश्मी ठाकरे यांना ५६ लाख १७ हजार ७१६ आणि हिंदू अविभक्त कुटुंबात १८ लाख ४७ हजार ३७८ असे सुमारे सव्वा कोटी दरवर्षी मिळतात. स्थावर मालमत्ता (जमिनीची किंमत) उद्धव ठाकरे यांची ५२ कोटी ४४ लाख ५७ हजार ९८४ तर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची २८ कोटी ९२ लाख ५९ हजार ३३६ आहे.
  • ठाकरे फॅमिलीवर कर्जसुध्दा आहे. त्यात उद्धव ठाकरे ४ कोटी ०६ लाख ०३ हजार ६२ आणि रश्मी ठाकरे ११ कोटी ४४ लाख ३३ हजार १०९ रुपये कर्जदार असल्याचे दाखविले आहे.

यापूर्वी विधानसभा निवडणुकीला आदित्य ठाकरे यांनी आपली संपत्ती जाहीर केली होती. त्यांची संपत्ती सुमारे २५ कोटींच्या दरम्यान आहे. त्यात बँक ठेवी १० कोटी ३६ लाख रुपये, बॉन्ड शेअर्स– २० लाख ३९ हजार रुपये, वाहन – BMW कार (MH -09 CB -1234) 2010 – किंमत अंदाजे ६ लाख ५० हजार रुपये, दागिने ६४ लाख ६५ हजार, इतर 10 लाख 22 हजार रुपये असे एकूण ११ कोटी ३८ लाख रुपये दाखविण्यात आले होते. दोन व्यावसायिक प्रॉपर्टीची किंमत अंदाजे साडेतीन कोटी रुपये आणि कर्जत खालापूरला एक शेतजमिनीचा प्लॉट अंदाजे ४४ लाख रुपये अशी छोट्या ठाकरे यांची मालमत्ता आहे.