क्रिकेट टीमचा स्पिनर युजवेंद्र चहल म्हणतो, हाय कतरीना मॅम…

0
317

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) : बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ सध्या लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटींच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या एका चॅट सेशनमध्येही कतरिना सहभागी झाली होती. या चॅट सेशनमध्ये तिने आपल्या फॅन्ससोबत चर्चा केली. परंतु, यादरम्यान भारतीय क्रिकेट टीमचा स्पिनर युजवेंद्र चहलने करतरिनाच्या लाइव्ह चॅटमध्ये कमेंट केली. सध्या ही कमेंट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचा फॅन आहे. अनेकदा त्याने स्वतः या गोष्टीला दुजोरा दिला आहे. त्याची आवडती अॅक्टर कतरिना असून त्याला ती खूप आवडते असं त्याने अनेकदा सांगितलं आहे. कतरिना आपल्या इन्स्टाग्राम लाइव्ह चॅटमध्ये फिटनेसबाबत फॅन्ससोबत चर्चा करत होती. तेव्हा युजवेंद्र चहलने कमेंट केली. त्याने कमेंटमध्ये लिहिलं की, ‘हाय कतरिना मॅम’.

युजवेंद्रने कमेंटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर अनेकदा शेअर केला जात आहे. तसेच त्याने केलेली कमेंट व्हायरल होत आहे. दरम्यान, 2017मध्ये एका मुलाखती दरम्यान, युजवेंद्र चहलने बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ तिची क्रश आहे. तो म्हणाला की, ‘मला कतरिना कैफ आवडते. तिची स्माइल मला फार आवडते.’

दरम्यान, कतरिना कैफ आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या अकाउंटवरून भांडी घासतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. कतरिना कैफच्या चित्रपटांबाबत बोलायचं झालं तर तिचा आगामी चित्रपट ‘सूर्यवंशी’ रिलीजसाठी तयार आहे. परंतु, कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटाची रिलीज डेट अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.