जवानांवर दगडफेक करु शकता, तुम्हाला अजून किती स्वातंत्र्य हवे आहे – अनुपम खेर

0
657

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – देशातील सुरक्षे व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करुन खळबळ  उडवणारे अभिनेते नसीरुद्दीन शहा यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनीसुद्धा शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. तुम्हाला अजून किती स्वातंत्र्य हवे आहे, असा खोचक प्रश्न खेर यांनी नसीरुद्दीन शहांना केला आहे.

भारतातील सध्याच्या परिस्थितीवर अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी चिंता व्यक्त केली होती.  समाजात मोठ्या प्रमाणावर विष पसरले आहे. यामुळे माझ्या मुलांना भारतात ठेवायची मला भीती वाटते, असे विधान नसीरुद्दीन शहा यांनी केले होते. यावर अनुपम खेर म्हणाले की,  तुम्ही या देशात भारतीय सेनेला शिव्या देऊ शकता, सेनेच्या जवानांवर दगडफेक करु शकता, तुम्हाला अजून किती स्वातंत्र्य हवे आहे.

दरम्यान, शहा यांनी म्हटले होते  की, आता गाईचा जीव माणसाच्या जीवापेक्षा महत्त्वाचा झाला आहे, देशातील सध्याच्या परिस्थितीचा मला प्रचंड संताप येतो. मला माझ्या मुलांची चिंता वाटते,  त्यानंतर अनेकांनी शहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे.