संत तुकारामनगरमध्ये तरुणीची छेडछाड करुन धमकी

0
918

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – प्रेम संबंधासाठी नकार दिल्याने एका तरुणाने २४ वर्षीय तरुणीची छेड काढून तिच्यासह तिच्या वडिलांना धमकावले. ही घटना पिंपरीतील संत तुकारामनगर परिसरात घडली.  

याप्रकरणी पीडित २४ वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार, आशिष रामराव लांडे (वय २६, रा. लांडे चौक, कासारवाडी) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष लांडे हा वारंवार २४ वर्षीय तरुणीचा पाठलाग करायचा आणि छेड काढायचा. तसेच तो वारंवार तरुणीला प्रेम संबंधाबाबत विचारत होता. तरुणीने नकार देऊन ही तो वारंवार तरुणीचा पाठलाग करुन छेड काढायचा. आरोपीने तरुणीचे ठरलेल लग्न देखील मोडले. तसेच, “तुझे मी कुठेही लग्न होऊन देणार नाही”, अशी धमकी तिला आणि तिच्या वडिलांना दिली. याप्रकरणी आशिष विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करत आहेत.