जम्मू-काश्मीर आणि लडाख स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश; संसदेत प्रस्ताव

0
570

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – केंद्र सरकारने संसदेत जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव आज (सोमवार) संसदेत मांडला आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याची तिथल्या जनतेची बऱ्याच काळापासून मागणी होती,  असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले.  त्यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे.

जम्मू व काश्मीरमध्ये मंत्रिमंडळ असेल. परंतु या कायद्याला केंद्रशासित राज्याचा दर्जा असेल तर लडाख हा मंत्रिमंडळ नसलेला केंद्रशासित प्रदेश असेल असा प्रस्ताव अमित शहा यांनी राज्य सभेत मांडला आहे. यामुळे काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करण्यात येणार आहे. या तरतुदीमुळे जम्मू व काश्मीरचा दर्जा अन्य राज्यांप्रमाणेच होणार आहे.

दरम्यान, अमित शहा यांनी सोमवारी राज्यसभेत काश्मीरच्या विषयावर निवेदन केले. त्यांनी जम्मू-काश्मीरला लागू असलेले घटनेचे कलम ३७० हटवण्याची शिफारस मांडली. अमित शाह यांनी ही शिफारस मांडताच संसदेत मोठया प्रमाणावर गदारोळ झाला.