जपानमध्ये पावसामुळे भीषण परिस्थिती; सहा लाख लोकांना स्थलांतरित होण्याचा आदेश

0
997

जपान, दि. २९ (पीसीबी)- जपानमध्ये मुसळधार पावासमुळे हाहाकार माजला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने सहा लाखांहून अधिक लोकांना स्थलांतरित होण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश उत्तरेकडील क्युशू येथील सागा, फुकुओका आणि नागासाकी भागांसाठी जारी करण्यात आला आहे.

सागा येथील रेल्वे स्थानक पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. तर अनेक गाड्यादेखील पावसाच्या पाण्यात बुडाल्या आहेत. काहीठिकाणी भूस्खलन झाल्याचे वृत्त आहे. पुरामुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून एकजण बेपत्ता आहे.

क्योडो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, हवामान विभागाने जपानधील पश्चिम आणि उत्तरेकडील परिसरात शुक्रवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. क्युशू रेल्वे कंपनीकडून अनेक सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. क्युशू येथील अनेक ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला होता. तसंच सुरक्षेच्या कारणास्तवव एक लाखांहून अधिक लोकांना आपले घर सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला होता.