जगातील ‘या’ ५ देशांकडे संविधान (लेखी राज्यघटना) नाहीये… त्यांचं शासन हे वेगळ्याच नियमांनुसार चालत..

0
187

येत्या २६ जानेवारी २०२१ रोजी भारत आपला ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करेल. २६ नोव्हेंबर १९४९ मध्ये भारतीय संविधान मंडळाने संविधान (राज्यघटना) लागू केली आणि २६ जानेवारी १९५० रोजी त्याची अंमलबजावणी केली. आपल्या देशाची स्वतःची लेखी राज्यघटना आहे, त्यातील बर्‍याच गोष्टी वेगवेगळ्या देशांच्या घटनेतून तयार केल्या आहेत. परंतु आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात असे काही देश आहेत ज्यांची स्वतःची लेखी राज्यघटना नाही. त्यांचा शासन हे वेगळ्या नियमांनुसार चालत. चला तर मग या देशांबद्दल जाणून घेऊया…

  1. न्यूझीलंडदक्षिण पश्चिम प्रशांत महासागरातील एक सुंदर बेट असलेल्या न्यूझीलंडला सुद्धा लिखित संविधान नाहीये. येथे एक अलिखित संविधान आहे, ज्याच्या आधारे येथे न्याय आणि प्रशासकीय यंत्रणा चालते. आधीच केलेल्या कायद्यांना आधार मानूनच इथे शासन चालते.

2. इस्त्राईल

१९४८ मध्ये मुक्त झालेल्या इस्त्राईलचीही स्वत: ची लेखी राज्यघटना नाही. तथापि, हा देश स्वतंत्र झाल्यानंतर येथे संविधान तयार करण्याबाबतचा विचार चालू होता. परंतु, संसदेत झालेल्या मतभेदांमुळे ते होऊ शकले नाही. येथे अलिखित घटना संसदेत मान्य केली गेली. ज्याद्वारे संपूर्ण देशाची शासन व्यवस्था चालविली जाते.

3. इंग्लंड (युनायटेड किंगडम)तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ज्या इंग्रजांनी भारतावर जवळजवळ २०० वर्षे राज्य केले त्या ब्रिटिशांच्या इंग्लंड देशात म्हणजेच युनायटेड किंगडममध्ये लेखी स्वरुपात संविधान नाहीये. इथे आधीपासूनच काही नियम बनवलेले आहेत, ज्याच्या आधारावर इथले शासन चालते. या नियमाना घटनेच्या अधिनियमां इतकेच महत्त्व आहे. इंग्लंड येथील कायदे हे वेळ आणि परिस्थितीनुसार संसदेद्वारा बदलता येतो.

4. सौदी अरेबिया

आपण सौदी अरेबियाच्या विचित्र नियमांबद्दल ऐकले असेलच, परंतु आपणास माहित आहे का की या देशात देखील स्वत: ची लेखी राज्यघटना नाही. होय, कारण, येथे कुराणात लिहिलेल्या गोष्टीच सर्वोच्च मानून निर्णय घेण्यात येतात.

5. कॅनडा, उत्तर अमेरिका

उत्तर अमेरिकन देश कॅनडाच्या राज्यघटनेवरून वाद आहे. काहींचा अस मानणं आहे की, इथे अलिखित घटनेने शासन केले आहे. तर काही लोक म्हणतात की, येथे एक लिखित घटना आहे. त्यामुळे इथे असा विश्वास आहे की कॅनडामध्ये एक लेखी राज्यघटना आहे, परंतु इथले सरकार हे अलिखित राज्यघटनेच्या नियमांचे पालन करते.