“जगातल्या ‘या’ सर्वात उंच मूर्तीं आपल्याला माहिती असायलाच हव्यात….”

0
736

एखाद्या महान व्यक्तीप्रती आदर दाखवण्यासाठी शिवाय येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना त्यांचं काम, त्यांचे कष्ट, त्यांची ओळख कायमस्वरूपी करून देण्यासाठी म्हणून अशा मोठ्या व्यक्तिमत्वांचा पुतळा उभारण्याची पद्धत जगात सर्व ठिकाणी आहे. शिवाय, जर का हा पुतळा सर्वात उंच असेल तर आपोआपच तो सर्वांच्या आकर्षणाचे स्थान बनतो आणि प्रसिदध होऊन आठवणीत राहतो. तर आज आपण अशा पुतळ्यांची(Statue) माहिती जाणून घेणार आहोत. जे प्रसिद्ध स्मारकं किंवा पुतळे आहेत. जे पाहण्यासाठी पर्यटक तुफान गर्दी करतात…

1.’स्टॅच्यू ऑफ युनिटी’जगातील सर्वात उंच स्मारक म्हणजे भारताचा अभिमान असलेले स्टॅच्यू ऑफ युनिटी हे आहे. गेल्याच वर्षी उद्घाटन झालेले हे स्मारक भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल ह्यांना समर्पित करण्यात आले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे तुकडे होऊ नयेत व देश एकसंध राहावा ह्यासाठी सरदार पटेल ह्यांनी जीवाचे रान केले. त्यांना आदरांजली म्हणून हे स्मारक बांधण्यात आले आहे. सरदार सरोवराच्याजवळ साधू बेट येथे हे स्मारक आहे. गुजरात मध्ये हे स्मारक आहे. ह्या स्मारकाची उंची १८२ मीटर असून वजन १७०० टन आहे. जगातील सर्वात उंच स्मारक असलेले हे स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे आपल्या भारत देशाची शान आहे.

2. ‘उशिकू दायबुत्सु’ हे स्मारक भगवान गौतम बुद्ध ह्यांना समर्पित आहे. उशिकू दायबुत्सु हे जपानमधील उशिकू, इबराकी प्रीफिक्चर भागात आहे. १९९३ साली ह्या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले असून १२० मीटर म्हणजे ३९० फूट उंच भगवान बुद्धांची इथली मूर्ती आहे. ह्याचा वेस ३३ फूट आहे आणि त्यावर १० मीटर उंचीचे कमळ आहे. जगातील सर्वात उंच मूर्ती म्हणून २००२ पर्यंत हिची ख्याती होती. ब्रॉन्झपासून बनवलेली ही भव्य मूर्ती आहे व भगवान बुद्धांचे अमिताभ रूप दाखवते. दिवसातून तीनवेळा येथील देवीची मूर्ती रंग बदलते.

3. ‘सेंडाई डाईकानन’न्योइरीन कन्नन ह्यांचा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. जपानच्या सेंडाई भागात हे स्मारक आहे. कन्नन किंवा अवलोकितेश्वर किंवा बोधिसत्व ह्यांचा हा पुतळा आहे. हे स्मारक जगातील सर्वात उंच स्मारकांमध्ये पाचवे आहे. १०० मीटर म्हणजेच ३३० फूट ह्या मूर्तीची उंची आहे. १९९१ साली हे स्मारक बांधून झाले तेव्हा ते जगातील सर्वात उंच स्मारक होते. ह्या मूर्तीमध्ये बोधिसत्वांच्या हातात एक विशिंग जेम म्हणजे रत्न आहे.

4. थायलंडची ‘बुद्ध प्रतिमा’अँग थोंग प्रदेशातील वॅट म्यूआंग मंदिरात असलेली ग्रेट बुद्ध स्टॅच्यू ऑफ थायलंड किंवा द बिग बुद्धा ही थायलंड मधील सर्वात उंच मूर्ती आहे. ९२ मीटर म्हणजे ३०२ फीट उंच व ६३ मीटर म्हणजे २१० फूट रुंद हि ही भगवान बुद्धांची मूर्ती आहे. ह्या मूर्तीचे काम १९९० साली सुरु झाले व २००८ साली हे बांधकाम पूर्ण झाले. ही मूर्ती सोन्याच्या रंगाने रंगवली असून काँक्रीटची आहे.

5. रॉडीना-मॅट झाव्योत्त (द मदरलँड कॉल्स)रशियाच्या व्होल्गोग्रॅड शहरात असलेले हे स्मारक बॅटल ऑफ स्टॅलिनग्रॅड ह्या युद्धात मातृभूमीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्त्रीला समर्पित करण्यात आले आहे. हे स्मारक जगातील सर्वात उंच मूर्ती १९६७ साली म्हणून घोषित करण्यात आले होते. युरोपातील सर्वात उंच स्मारक म्हणून आजही हे स्मारक आहे. तर जगभरातील स्त्रियांच्या स्मारकांपैकी हे आजही जगातील सर्वात उंच स्मारक म्हणून गणले जाते. ह्या स्मारकाचे अनावरण १५ ऑक्टोबर १९६७ रोजी करण्यात आले. ८५ मीटर उंच म्हणजेच २७९ फुटाचे हे स्मारक आहे. युद्धाच्या तयारीत असलेली तलवार घेतलेली स्त्री असा हा पुतळा आहे. ती तलवार घेतलेली स्त्री म्हणजे मातृभूमीचे प्रतीक आहे.

6. स्प्रिंग टेम्पल बुद्धा- चीनवैरोकाण बुद्धांना चीन मधील हे मंदिर समर्पित केले आहे. चीनच्या लुशान भागातील हेनान येथे ही मूर्ती उभारली आहे. १९९७ ते २००८ पर्यंत ह्या स्मारकाचे बांधकाम सुरु होते. जगातील सर्वात उंच अशी २०१८ पर्यंत ही मूर्ती होती. येथे भगवान बुद्ध कमळाच्या आसनावर विराजमान असलेले दिसतात. ह्या भव्य मूर्तीची उंची तब्बल १८२ मीटर म्हणजे ५९७ फूट आहे. भगवान बुद्धांना ही मूर्ती समर्पित केली असून ह्या मूर्तीच्या खाली मठ आहे. ह्या स्मारकाला स्प्रिंग टेम्पल बुद्धा असे म्हणतात कारण येथे जवळच Tianrui hot spring हा गरम पाण्याचा झरा वाहतो. ह्या झऱ्याच्या पाण्याचे तापमान ६० डिग्री सेल्सियस इतके गरम असते. ह्या ठिकाणी रोग्यांचे आजार बरे होतात अशी मान्यता आहे.