छोट्या बचत योजनांच्या व्याजावर फिरली कात्री; आता किती व्याजदर मिळणार?.. जाणून घ्या

0
455

नवी दिल्ली, दि.०१ (पीसीबी) : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड किंवा पीपीएफद्वारे गुंतवणूक करणार्‍यांना सरकारने निराश केले आहे. कारण त्याचा व्याज दर ७० बेस पॉईंटने कमी केला आहे. आतापर्यंत त्यास वार्षिक व्याज ७.१ टक्के मिळत होते, ते आता कमी करून ६.४ टक्क्यांवर आणले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय बचत योजनेवर (एनएससी) ५ वर्षाच्या व्याज दरामध्ये ९० बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली आहे.

ज्यांनी लहान बचत योजनांच्या माध्यमातून गुंतवणूक केली त्यांना केंद्र सरकारमुळे धक्का बसला आहे. बुधवारी छोट्या बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार छोट्या योजनांवरील व्याजदरात १.१० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. नवीन दर १ एप्रिल २०२१ पासून लागू होतील.

ज्यांनी लहान बचत योजनेतून गुंतवणूक केली. त्यांना केंद्र सरकारचा धक्का बसला आहे. छोट्या बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय बुधवारी सरकारने घेतला. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार छोट्या योजनांवरील व्याजदरात १.१० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. नवीन दर १ एप्रिल २०२१ पासून लागू होतील.

‘पीपीएफ व्याजदर ७० बेस पॉईंटने कमी’ :
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड किंवा पीपीएफद्वारे गुंतवणूक करणार्‍यांना सरकारने निराश केले आहे. कारण त्याचा व्याज दर ७० बेस पॉईंटने कमी केला आहे. आतापर्यंत त्यास वार्षिक व्याज ७.१ टक्के मिळत होते, ते आता कमी करून ६.४ टक्क्यांवर आणले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात ५ वर्षाच्या व्याज दरामध्ये ९० बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली आहे. पूर्वी त्यात ६.८ टक्के व्याज मिळत असे. आता ते ५.९ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

‘सुकन्या समृद्धी योजनेत भारी कपात’ :
बालिकेच्या शिक्षण आणि लग्नासाठी सुरू केलेली महत्वाकांक्षी सुकन्या समृद्धि योजनेच्या (सुकन्या समृद्धि योजना) देखील व्याजदरात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. आत्तापर्यंत योजनेला वार्षिक ७.६% व्याज मिळत होते. आता ते ६.९ टक्क्यांपर्यंत खाली करण्यात आले आहे. याचा अर्थ असा की यामध्ये ७० बेसिस पॉईंट्स कमी करण्यात आले आहेत.

‘एक वर्षाच्या ठेवीमध्ये १.१०% घट’ :
एक वर्षाच्या ठेवीवर पूर्वी ५.५ टक्के व्याज मिळत होते, आता ते ४.४ टक्के करण्यात आले आहे. याचा अर्थ असा की १.१० टक्क्यांची जोरदार कपात झाली आहे. दोन वर्षांच्या मुदतीच्या ठेवी आता ५.५ टक्क्यांऐवजी ५.० टक्के आणि तीन वर्षाची मुदत ठेवी ५.५ टक्के ऐवजी ५.१ टक्के आहे. पाच वर्षाच्या मुदत ठेवी वर आता ६.७ ऐवजी ५.८ टक्के आणि ५ वर्षाच्या रिकर्निंग डिपॉझिटवर ५.८ टक्के ऐवजी ५.३ टक्के व्याज दिले जाईल.

‘ज्येष्ठ नागरिक बचत योजना’ :
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेला आतापर्यंत ७.४% व्याज मिळत असे. हे कमी करून ६.५ टक्के केले आहे. मासिक उत्पन्न खात्यातही आता ६.६ टक्केऐवजी ५.७ टक्के व्याज मिळेल. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) वर ६.८ टक्क्यांऐवजी आता ५.९ टक्के व्याज मिळेल.

‘किसान विकास पत्रावरील व्याज कमी, परिपक्वता कालावधी वाढला’ :
कमी उत्पन्न असणार्‍या लोकांसाठी गुंतवणूकीचे लोकप्रिय साधन किसान विकास पत्र (केव्हीपी) मध्येही व्याज दर कमी करण्यात आला आहे. पूर्वी या योजनेला ६.९ टक्के व्याज मिळत होते, तर मुदतपूर्ती कालावधी १२४ महिने होता. आता त्यास केवळ ६.२ टक्के व्याज मिळेल, तर मुदतीचा कालावधी हा १३८ महिन्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे.

‘ठेवी बचत करण्यावर ३.५% व्याज’ :
सरकारने आता बचत बँक खाते किंवा बचत ठेवीवरील व्याज दर ४.० टक्क्यांवरून ३.५ टक्क्यांवर आणला आहे. याचा अर्थ असा की यात गुंतवणूकदारांचा सुद्धा निम्म्या टक्क्यांनी तोटा झाला आहे.